आज सकाळपासूनच पावसाने अगदी कहर केलायं. थांबायचं नाव नाही. म्हणूनच बाहेरची चार काम उद्यावर ढकलली होती. अन् सगळं आवरून जरा बसतच होते. तेवढ्यात कानावर हाक "हाई का काई, बाई".
आता एवढ्या पावसात कोणं आलं. बघते तर पुष्पाबाई. आमच्या फॅमिली भंगारवाल्या. म्हणजे आधी सासूबाई तिला भंगार विकायच्या, आता मी.
मी : अहो इतक्या पावसाचं कशाला यायचं काकू
पुष्पाबाई : काय करनार ताई. पोटासाठी करावं लागत.
मी (नेहमीप्रमाणे) : जेवायचं का थोडं.
पुष्पाबाई : नगं अगं उपास हायती नौ दिसाचे. देवाचं देणं असतं. फेडावं लागतं बाई....
झालं मग आमचं देणं-घेणं झालं. अन् त्या डोक्यावर भार घेऊन गेल्या. पण माझ्या मनातून नाही गेल्या.
पुष्पाबाई पन्नाशीच्या आसपासंच वय. उदरनिर्वाहासाठी हे साधन. आज काम केलं तरच चूल पेटेल, अशी परिस्थिती.
घरी आई आणि नातू. बाकी सगळे अवेळी म्हणजे नवरा हिच्या तरूणपणी आणि मुलगा हिच्या म्हातारपणी देवाघरी गेलेले.
देवाने हिला दिलेलं समाधान त्या कोणाबरोबरचं गेलं नाही.
तिनं तिची सगळी कहाणी मला एकदा सांगितलीनं. केवळ दु:ख या पलीकडे काहीच नाही. पण तिच्या बोलण्यात कधी देवावर राग नाही. माझ्याच नशीबी असं का म्हणून कधी नशीबाला बोलं नाही.
नेहमी हसतमुख चेहरा. पैसे तुम्हालाच राहू देत. यावर तुझं पोरगं बिस्किटं मागलं, तवा कामाला येतील. असं मलाच सांगणारी.
अन् आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सुखवस्तू पण असमाधानी. असलेल्या सुखांबद्दल देवाचे आभार तर राहू देतं. पण ती मान्यही न करता. अजून सुखं मिळवण्यासाठी आजच्या सुखांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सगळ्या अवतीभवती दिसायला लागल्या.
प्रगतीचे विचार नक्की असावेत ना मनात. पण ते स्वतःच्या निकषांवर. दुस-याकडे बघून नको. आणि मी म्हणतच नाहीये अल्पसंतुष्ट व्हा. पण जे आहे त्याचं समाधानही वाटू द्या मनात. कृतज्ञता वाटू द्या.
जे हवं ते आपोआप येईलच. अन् नाही आलं तरी जीवन जगल्याचा आनंद नक्की पदरात असेलच.
बघा तुम्हाला पटतयं का,
मृण्मयीच्या मनातलं.

No comments:
Post a Comment